Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यासाठी आला नाही, तर पाक संघ विश्वचषक स्पर्धेतून माघार घेईल !
|
नवी देहली – वर्ष २०२५ मध्ये ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेचे सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. यासाठी पाकिस्तानने वेळापत्रकही बनवले आहे. त्यानुसार भारतीय क्रिकेट संघाचे सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. भारताने मात्र ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी पाकिस्तानात जाणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे. ‘पाकिस्तानात जाण्याऐवजी अन्य देशाच्या भूमीवर भारताचे सामने खेळले जावेत’, अशी भारताची भूमिका आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (‘पीसीबी’ला) हे मान्य नसून त्याने ‘भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला, तर भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०२६ मध्ये होणार्या टी-२० विश्वचषकातून पाकिस्तान संघ बाहेर पडेल’, अशी धमकी दिली आहे. पीसीबी संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यावर ठाम आहे.
वर्ष २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध राजकीय अन् सुरक्षा यांमुळे तणावपूर्ण झाले आहेत. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामनेही स्थगित करण्यात आले होती. वर्ष २००८ मध्ये आशिया चषकासाठी भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हापासून दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धा किंवा अन्य देशाच्या भूमीवर आयोजित ‘आशिया कप’ स्पर्धेत समोरासमोर येतात.
संपादकीय भूमिका
|