‘मानवाच्या स्तरा’नुसार साधना शिकवणारा ‘गुरुकृपायोग’ !
‘मानवाचा स्तर’ हे सर्वसाधारण मनुष्याची स्थिती दर्शवणारे परिमाण आहे. हा स्तर विविध आध्यात्मिक आणि मानसिक घटकांच्या आधारे अभ्यासता येतो.
१. आध्यात्मिक
अहंचे प्रमाण, ईश्वराप्रतीचा भाव, आध्यात्मिक पातळी आणि वाईट शक्तींच्या त्रासाची तीव्रता
२. मानसिक
स्वभावातील गुण आणि दोष
पूर्वीच्या काळात मानवाचा स्तर चांगला असल्यामुळे त्या काळात ज्ञानयोग, हठयोग, भक्तीयोग यांसारख्या साधनामार्गांनुसार साधना करणे सहज शक्य होते. आता कलियुगामध्ये मानवाचा स्तर पुष्कळच खालावत चालला आहे. त्यामुळे सध्याच्या काळात या साधनामार्गांनुसार साधना केल्यास प्रगती होण्यास अधिक कालावधी लागू शकतो. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामध्ये कलियुगातील ‘मानवाच्या स्तरा’शी संबंधित सर्व घटकांसाठी नेमकेपणाने उपाययोजना दिलेली आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने साधकांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे.
– सच्चिदनंद परब्रह्म डॉ. आठवले
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |