‘ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन’कडून मुलांसाठी प्रवचन आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम !
शिक्रापूर (जिल्हा पुणे), १४ जुलै (वार्ता.) – ‘ऋतुध्वज सोशल फाऊंडेशन’ हिवरे शिक्रापूर शाखेच्या वतीने गुरुकुल वसतीगृह कासारी फाटा, शिक्रापूर या ठिकाणी अनाथाश्रमातील मुलांना धान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्याचसह ह.भ.प. सृष्टीताई पिंगळे यांनी मुलांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. या वेळी हिवरे गावाचे माजी उपसरपंच श्री. विश्वनाथ (आबासाहेब) शिकर्े, श्री. हिरामण गायकवाड, हिवरे गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. वसंत गायकवाड, युवा सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रेवनाथ गायकवाड हे उपस्थित होते.