Obscene Video : प्रेमसंबंधाला विरोध असल्याने पिता आसिफने स्वतःच्याच मुलीचे अश्लील व्हिडिओ केले प्रसारित !
पडुबिद्री (कर्नाटक) – एका मुलीचे तौसिफ नावाच्या एका तरुणासमवेत प्रेमसंबंध होते. त्याला मुलीचा पिता आसिफ याचा विरोध असल्याने त्याने रागाच्या भरात स्वत:च्या मुलीचे अश्लील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केले. या विरोधात आसिफच्या पत्नीने, म्हणजे मुलीच्या आईनेच आसिफविरुद्ध पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. आरोपी आसिफ हा कंचीनड्का येथील, तर मुलीचा प्रियकर तौसिफ हा तीर्थहळ्ळी गावातील रहिवासी आहे.
आसिफने तौसिफला घरी बोलावून त्याला मारहाण केली. त्याने तौसिफ आणि त्याची मुलगी यांचे भ्रमणभाष काढून घेतले अन् त्यांच्या भ्रमणभाषांधील अश्लील व्हिडिओ रागाच्या भरात विविध व्हॉट्सप गटांवर प्रसारित केले. या सगळ्या घडमोडीचा धक्का सहन न झाल्याने मुलीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य असलेले मनाविरुद्ध झाल्यास गुन्हेगारी करण्यात कुठल्याही थराला जाऊ शकतात, याचे हे एक उदाहरण ! |