भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी असणे !

‘पंढरपूर, श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी, एकादशी आणि वारी यांची एक विशिष्ट सांगड आहे. या सर्वांत एक समान धागा आहे की, ज्यामुळे एक सुंदर पुष्पमाळ सिद्ध होते. माळेला मणी असतात आणि ते एका सूत्रात गुंफतात. त्याप्रमाणे भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी आहेत. श्री विठ्ठलाच्या नित्यउपासनेसह नैमित्तिक उपासनाकर्म प्रतिवर्षी करावयाची सामूहिक उपासना याला अधिक महत्त्व आहे. प्रतिवार्षिक करावयाच्या उपासनेला वारी ही संकल्पना रुढ आहे. या वारीसाठी एकादशी हा महापर्वकाळ म्हणून निवडण्यात आलेला आहे. त्यामुळे ‘एकादशी म्हणजे काय ? त्याचा वैयक्तिक लाभ काय ?’, असे प्रश्न अनावश्यक आहेत. एकादशीकडे ‘पुण्यसंचय व्हावा’, या एका सद्हेतूने पहाणे गैर आहे. एकादशी व्रताचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना होणार आहेत अन् झाले पाहिजेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक महिन्यात दोन एकादशा येतात. एखाद्या पंधरवड्यात स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशा येतात. स्मार्त ही शंकराची एकादशी आणि भागवत ही श्रीविष्णूची एकादशी होय.’

– श्री. काशीनाथ थिटेकाका (हिंदुत्वनिष्ठ), पंढरपूर