भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो !

प.पू. भक्तराज महाराज

‘नाथा तुझ्या पायी जैसा ज्याचा भाव । तैसा त्यासी ठाव चरणी तुझ्या ॥’, असे भावाचे महत्त्व प.पू. भक्तराज महाराज यांनी वर्णिले आहे. ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्‍या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.