Jihadi Youths ISIS Connection : छत्रपती संभाजीनगर येथील ५० जिहादी तरुण इस्लामिक स्टेटच्या संपर्कात !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या आरोपपत्रातून उलगडा !
छत्रपती संभाजीनगर – जिहादी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटचे जाळे छत्रपती संभाजीनगर येथेही पसरले आहे. किमान ५० मुसलमान तरुण या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात आहेत. १५ फेब्रुवारी २०२४ या दिवशी शहरातील हर्सूल परिसरातील बेरीबाग परिसरातून ‘एन्.आय.ए.’ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) महंमद जोएब खान (वय ३५ वर्षे) याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध १२ जुलै या दिवशी मुंबई येथील ‘एन्.आय.ए.च्या न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले. त्यात छत्रपती संभाजीनगर येथून चालू असलेल्या इस्लामिक स्टेटच्या कारवायांची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
50 Ji#adi youth from Chhatrapati Sambhajinagar in contact with ISIS – NIA chargesheet reveals
This proves that Chattrapati Sambhajinagar has become a hub for Ji#adi terrorists.
Since Ji#adi terrorism has spread even to the smallest of streets, the Government must take… pic.twitter.com/Q3Y03Rrtfu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 13, 2024
१. लिबिया देशातून जगभरात इस्लामिक स्टेटचे जाळे पसरवणारा महंमद शोएब खान याने आयटी अभियंता असलेल्या जोएब याची भरती केली होती. (मुसलमान कितीही शिकलेले असले, तरी त्यांची धर्मांध आणि जिहादी वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) जोएब त्याच्यासाठी ‘स्लिपर सेल’ (आतंकवाद्यांना साहाय्य करणारे गट) म्हणून काम करत होता.
२. देशातील संवेदनशील ठिकाणांवर आक्रमण करण्यासाठी जोएब याच्या साहाय्याने शोएब याने जिहादी तरुणांची टोळी बनवली होती.
३. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्किये येथे पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबिया येथील शोएब आणि छत्रपती संभाजीनगर येथील जोएब त्या कटाचे मुख्य सूत्रधार होते, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे.
जोएब याचा एक भाऊही आयटी अभियंता असून तो आहे लिबिया येथे नोकरीला !
जोएब हा सामान्य कुटुंबातील आहे. फेब्रुवारी महिन्यात एन्.आय.ए.ने जोएब याला अटक करून शहरात ९ ठिकाणी धाडी घातल्या. तो विवाहित असून त्याला २ मुली आहेत. त्याचे वडील निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. जोएब बेंगळुरू येथे नोकरी करतो. अलीकडे ‘वर्क फ्रॉम होम’ (घरातून काम करणे) करत होता. त्याचे २ भाऊ आखाती देशात नोकरी करतात. त्यांतील १ आयटी अभियंता असून तो इस्लामिक स्टेटचे मोठे जाळे असलेल्या लिबिया येथील एका आस्थापनात काम करतो.
भारतातील अन्य तरुणांनाही जाळ्यात ओढण्याचे दायित्व !
आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी इस्लामिक स्टेटसारख्या संघटना जिहादी तरुणांना ‘बायथ’ म्हणजेच निष्ठेची प्रतिज्ञा देतात. इस्लामिक स्टेटचा स्वयंघोषित खलिफा (प्रमुख) ही शपथ देतो. ही प्रतिज्ञाही जोएब याने घेतली होती. महाराष्ट्रासह भारताच्या इतर राज्यांतील तरुणांना जाळ्यात ओढण्याचे दायित्व जोएब याच्याकडे होते. माथी भडकावणार्या गोष्टी सांगून तरुणांना इस्लामिक स्टेटकडे आकर्षित करण्यासाठीचे संकेतस्थळ (वेबसाइट) बनवण्याचे दायित्व जोएब याच्यावर सोपवण्यात आले होते. ते काम छत्रपती संभाजीनगर येथे राहून तो करत होता. अतिरेकी होण्यास आतुर असलेल्यांची यंत्रणा तो सिद्ध करत होता.
व्हॉट्सअॅप गटावर चालू होते ‘चॅटिंग’ !
‘महंमद शोएब खान याने भरती केलेल्या महंमद जोएब खान याने ‘व्हॉट्सअॅप गट’ बनवला होता. या गटात जोएब याने शहरातील ५० तरुणांना सहभागी केले. या गटावर अनेक ठिकाणी मोठ्या आक्रमणांसाठी स्फोटकांची निर्मिती आणि आधुनिक स्फोटके बनवण्याचे व्हिडिओ घातले जात होते. त्यांनी कारवाईचे पूर्ण नियोजनही सिद्ध केले होते’, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाछत्रपती संभाजीनगर हा जिहादी आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे, हेच यातून सिद्ध होते. जिहादी आतंकवाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोचला असतांना तो रोखण्यासाठी सरकारने आक्रमक पावले उचलणे आवश्यक ! |