नवविवाहित महिलेला पतीच्या रेशनकार्डद्वारे ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेता येणार !

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवविवाहित महिलेसाठीही ‘उत्पन्नाचा दाखला’ म्हणून रेशनकार्ड अनिवार्य होते; मात्र विवाहानंतर रेशनकार्डवर नाव चढवण्याला विलंब लागत असल्यामुळे राज्यशासनाने हा नियम शिथिल केला आहे. यापुढे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेला पतीच्या रेशनकार्डद्वारेही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

परराज्यातील महिलेचा महाराष्ट्रातील पुरुषासमवेत विवाह झाला असेल, तर तिच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. अशा महिलेच्या पतीचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड आणि मतदान कार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेसाठी टपालातील खातेही ग्राह्म धरण्यात येणार आहे. यापूर्वीच्या िनयमावलीमध्ये राज्यशासनाने वरीलप्रमाणे नियम शिथिल केले आहेत. याविषयी १२ जुलै या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे.