आपण आपल्या आई-वडिलांप्रमाणे भगवंतावर प्रेम करावे !
प्रपंच नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही. मुखाने भगवंताचे नाम, नीतीचे आचरण आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही, ते प्रेमाने साधेल. आपण जसे आपल्या आई-बापांवर, मुलाबाळांवर प्रेम करतो, तसे भगवंतावर प्रेम करावे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज विद्येचे सागर होते. परमात्मस्वरूप जगद्गुरु संत तुकारामबुवांजवळ अशी काय विद्या होती; पण त्यांनी देवावर कितीतरी प्रेम केले ! आज लाखो लोक पंढरीला जातात, ही त्याची साक्ष आहे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)