कठीण प्रसंगातही सत्याचे अनुसरण करणे महत्त्वाचे !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
पर्वतप्राय अडचणी समोर उभ्या राहिल्या, तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी आहे का ? तलवार उपसून सारे जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तुमच्या बायका-मुलांनी साथ दिली नाही, तरी तुम्हाला जे योग्य वाटते, जे सत्य वाटते, ते प्रत्यक्ष करून दाखवण्याची धमक तुमच्यात आहे का ? तुमची सगळी धनदौलत नष्ट झाली, तुमचा सर्व नावलौकिक नाहीसा झाला, तरी सत्याला चिकटून रहाण्याचे धाडस तुमच्यामध्ये आहे का ? अशा परिस्थितीतही सत्याचेच अनुसरण करत तुम्ही आपल्या ध्येयाच्या मार्गावर नेटाने पुढे पुढे जात रहाल का ?
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)