पंढरपूर वारीला ‘जागतिक वारसा’ नामांकन देण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागाला सादर !

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – पंढरपूरच्या वारीला युनेस्को जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा नामांकन प्राप्त व्हावे, यासाठीचे संशोधन करण्यासाठी राज्यशासनाने मुंबई येथील ‘मे. आभा नारायण लांबा असोशिएट्स’ या आस्थापनाची नियुक्ती केली होती. या आस्थापनाने याविषयीचे संशोधन आणि व्हिडिओ चित्रीकरण पुरातत्व विभागाच्या संचालकांकडे सादर केले आहे. पुरातत्व विभाग याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करणार आहे. हा प्रस्ताव सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाकडून पुरातत्व विभागाला ८ लाख ८५ सहस्र रुपये निधी देण्यात आला आहे.