Mohammad Arif Arrested For Accepting Bribe : कनिष्ठ पोलिसाकडून १८ सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस निरीक्षक महंमद आरिफ याला रंगेहात अटक
उळ्ळाल (कर्नाटक) – कनिष्ठ पोलिसाकडून १८ सहस्र रुपयांची लाच घेणार्या महंमद आरिफ या पोलीस निरीक्षकाला मंगळुरू लोकायुक्त पोलिसांनी रंगेहात अटक केली. महंमद आरिफ याने चांगल्या ठिकाणी नियुक्ती करण्यासाठी २० सहस्र रुपये देण्यासह प्रतिमहा ६ सहस्र रुपये देण्याची मागणी केली होती. आतापर्यंत आरिफ याला प्रतिमास ६ सहस्र रुपये देण्यात येत होते. ५० सहस्रांहून अधिक रक्कम आरिफने आतापर्यंत घेतली होती.
कनिष्ठ पोलिसाचे वडील आजारी असल्याने ३ मासाचे १८ सहस्र रुपये त्याला आरिफला देता न आल्याने आरिफने त्याला दुसरीकडे नियुक्ती करण्याची धमकी दिली होती. यानंतर संबंधित पोलिसाने लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर आरिफ याला कनिष्ठ पोलिसाकडून १८ सहस्र रुपये घेतांना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाधर्मांध कितीही शिकले आणि कोणत्याही पदावर पोचले, तरी त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्या ! |