Drunk Cops Arrive For Drunkards : दारूड्यांना हुसकावून लावायला आलेले पोलीस स्वतःच होते मद्यधुंद !
सुळ्या (कर्नाटक) येथील घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित !
सुळ्या (कर्नाटक) – गुत्तीगारू बसस्थानकावर दारू पिऊन लोकांना त्रास देत असलेल्या व्यक्तींना हाकलवून लावण्यासाठी आलेले पोलीस स्वतः दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
एका महिलेने हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करून गुत्तीगारू बसस्थानकावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तींमुळे येथे लोकांना त्रास होत असल्याची तक्रार केली होती. या वेळी एक साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि शिपाई गाडी घेऊन तेथे आले होते. त्यांनी दारू पिणार्यांवर कारवाई केली नाही. हे दोघे पोलीस दारू प्यायलेले असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना ‘गाडी चालवू नका’, असे सांगितले, तसेच गाडी तेथेच ठेवून जाण्याचाही सल्ला दिला. त्यावर पोलिसांनी, ‘आम्ही सुळ्या पोलीस ठाण्याचे आहोत आणि आम्ही प्रतिदिन दारू पितो; पण आता आम्ही दारू प्यायलेलो नाही असे सांगितले . (इतर वेळी दारू पिऊन गाडी चालवणार्या लोकांवर कारवाई करणारे पोलीस स्वतःच दारू पिऊन गाडी चालवतात आणि वर खोटे बोलतात ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा दारूड्या पोलिसांवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकार काय कारवाई करणार आहे ? कामावर असतांना किती पोलीस दारू पितात ?, याची चौकशी सरकार करणार आहे का ? |