Halal Tea : आय.आर्.सी.टी.सी.चे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडे बोट !
|
(आय.आर्.सी.टी.सी. म्हणजे भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ)
नवी देहली – सामाजिक माध्यमांत एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वेमध्ये चहाच्या पाकिटावर हलाल प्रमाणपत्राच्या उल्लेखावर आक्षेप घेतांना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचेही सांगण्यात येत आहे. याविषयी आय.आर्.सी.टी.सी.ने उत्तर दिले आहे की, हा एक दिशाभूल करणारा व्हिडिओ आहे. कृपया यावर विश्वास ठेवू नका आणि तो पुढे पाठवू नका. आय.आर्.सी.टी.सी. त्याच्या खाद्यपदार्थांसाठी केवळ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’चे अनुसरण करत आहे.
IRCTC points at FSSAI when questioned on serving 'Halal' certified tea on Indian Railways.
Further says, 'Tea served is vegetarian'
👉Although the eatables for sale in the railways are already certified by the FSSAI, why do the railways need a 'Halal certification' over that ?… pic.twitter.com/Cp4Z475128
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2024
या व्हिडिओमध्ये ‘श्रावण महिन्यात (उत्तर भारतात सध्या श्रावण महिना चालू आहे) हलाल प्रमाणित पदार्थ खाण्यास देणे, म्हणजे आमच्या (हिंदूंच्या) धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे’, असे प्रवासी सांगतांना दिसत आहे. त्याच वेळी रेल्वे कर्मचारी प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न करतात की, ‘चहा मांसाहारी नसून शाकाहारी आहे !’
संपादकीय भूमिका
|