Allahabad High Court : हिंदु पत्नीची हत्या करणार्‍या मुसलमान पतीचा जामीनअर्ज पुन्हा फेटाळला !

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने पत्नीची केली होती हत्या

अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज – लग्नानंतर इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदु पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी शोएब अख्तर याचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाने दुसर्‍यांदा फेटाळला आहे. आरोपी शोएब अख्तरचा पहिला जामीनअर्ज उच्च न्यायालयाने यावर्षी जानेवारीत फेटाळला होता. त्याच्यावर त्याची पत्नी प्रियाची हत्या केल्याचा आरोप आहे; कारण तिने पती शोएब अख्तर आणि त्याचा मित्र एजाज अहमद यांच्या दबावानंतरही इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला होता.

या प्रकरणी सिंदुरिया गावातील पोलिसांना २१ सप्टेंबर २०२० या दिवशी नाल्यात एक शिरच्छेद केलेला मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. नंतर तो मृतदेह प्रिया नावाच्या महिलेचा असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी अन्वेषणानंतर शोएबने हत्या केल्याचे उगड झाले होते. प्रियाच्या मृतदेहाचे २ तुकडे करून नाल्यात फेकण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी शोएब अख्तर आणि मित्र एजाज यांना अटक केली होती. एजाजला जामीन मिळाल्याच्या आधारे शोएबनेही न्यायालयात जामीन मागितला होता.

संपादकीय भूमिका

मुसलमान तरुण हा प्रथम कट्टर मुसलमान असतो आणि नंतर पती, प्रियकर किंवा मित्र असतो, हे त्यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार्‍या हिंदु मुलींच्या कधी लक्षात येईल ?