नवी मुंबई येथे ८ कोटी रुपयांचे ८ टन रक्तचंदन जप्त, ५ जणांना अटक !
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे विभागाची कारवाई !
पुणे – नवी मुंबईतील ‘जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट’च्या बंदरातून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे कार्यालयातील पथकाने कारवाई करत ८ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी पथकाने निर्यातदार, दलाल, गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदार यांसह ५ जणांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पकडलेल्या रक्तचंदनाची किंमत ७ कोटी ९० लाख रुपये आहे.
आरोपींकडे केलेल्या चौकशीनंतर अहिल्यानगर, नाशिक आणि भाग्यनगर येथे कारवाई केली. नाशिक येथून २ टन रक्तचंदन जप्त करण्यात आल्याची माहिती पथकाने दिली आहे.