नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांच्या विजेसाठी उपाययोजना करावी ! – प्रवीण दरेकर, गटनेता, विधान परिषद
मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे; मात्र आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात ‘नॅशनल पार्क’मधील आदिवासी पाडे आजही विजेविना रहात आहेत, हे दुर्दैव असून शासनाने याविषयी उपाययोजना करावी’, अशी विनंती भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ११ जुलै या दिवशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील काळात ‘विशेष गोष्ट’ म्हणून आदिवासी पाड्यांना विजेची जोडणी दिली होती; मात्र त्यावर वनविभागाने आक्षेप घेतला. हे सातत्याने चालू असते. दरेकर यांच्या सूचनेतील व्यवहार्यता पडताळून घेतली जाईल आणि ती सूचना व्यवहार्य असेल, तर निश्चितपणे उपाययोजना केली जाईल.