तुर्भे विभागातील रस्त्यांवर मोठे खड्डे !

तुर्भे विभागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे.

नवी मुंबई – सततच्या पावसामुळे तुर्भे विभागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांच्या हे लक्षात आणून देऊनही प्रशासनाने याविषयी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

काही ठिकाणी केबल टाकल्यानंतर तेथे थातुरमातुर डांबरीकरण करण्यात आले होते. परिणामी पहिल्या पावसातच या चरांमधील सर्व डांबर निघून गेले असून तेथे खड्डे पडले आहेत. खड्डे पडल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसून आले. ‘या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत’, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

संपादकीय

मोठमोठे खड्डे पडूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन काय कामाचे ?