वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्र करण्याची सरकारची घोषणा ! – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

प्रत्यक्षात रुग्णांची वाढ !

तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – केंद्रशासनाच्या क्षयरोगमुक्त ‘भारत – वर्ष २०३०’ घोषणेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वर्ष २०२५ पर्यंत राज्याला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात जून २०२४ च्या अहवालानुसार राज्यात क्षयरोग्यांची संख्या वाढली आहे. स्वतः आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती ११ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. येत्या महिन्याभरात क्षयरोग्यांच्या संख्येविषयी अहवाल मागवण्यात येणार आहे. या अहवालावरून पुढील उपाययोजना निश्चित करण्यात येईल. राज्यात पुरेशा प्रमाणात क्षयरोगावरील औषधे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत १३ कोटी रुपयांच्या क्षयरोगाच्या औषधांची खरेदी करण्यासाठी प्रावधान करण्यात आलेले आहे.