अपंग मुलांच्या शाळा आणि मतीमंद मुलांची बालगृहे येथे १० दिवसांत पद मान्यता देणार ! – मंत्री दादाजी भुसे
मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – राज्यात ३० सप्टेंबर २००२ च्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या अपंग मुला-मुलींसाठीच्या शाळा आणि मतीमंद मुलांची बालगृहे यांना अनुदान देण्यासाठी ३ महिन्यांत धोरण निश्चित करण्यात येईल. १० दिवसांत पदमान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी १० जुलै या दिवशी विधानसभेत दिले. आमदार सदस्य आशिष जैसवाल यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना भुसे यांनी वरील माहिती दिली.