पुणे येथील कु. चिन्मय मुजुमले (वय १५ वर्षे) याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती
१. कु. चिन्मयच्या मनात येणारे नकारात्मक विचार रामनाथी आश्रमात पोचताच नष्ट होऊन त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असे वाटणे
‘मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली आहे’, हे कळल्यावर मला आनंद झाला. दुसर्या क्षणी मात्र मला ‘आश्रमात जाऊ नये’, असे वाटले; कारण ‘माझी दहावीची परीक्षा आहे आणि शाळेतून पुष्कळ अभ्यास करायला दिला आहे’, असे मला वाटले. तेव्हा मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना केली, ‘माझ्यासाठी जे योग्य असेल, तसे होऊ दे.’ त्यानंतर पुण्याहून निघाल्यापासून ते आश्रमात पोचेपर्यंत माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येत होते; पण आश्रमात प्रवेश करताच, सर्व नकारात्मक विचार नष्ट झाले आणि मला चैतन्यदायी अन् प्रसन्न वाटले. मला ‘सतत परात्पर गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे जाणवले.
२. सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्याकडून चैतन्य मिळणे
सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) आणि त्यांची बहीण (कु. श्रिया राजंदेकर, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १३ वर्षे) हे बोलत होते. तेव्हा त्यांच्याकडून मला पुष्कळ चैतन्य मिळाले. पू. वामन ‘नमस्कार !’ इतकेच बोलले, तरी माझ्या मनातील सर्व वाईट विचार नष्ट झाले.
३. आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत असतांना जाणवलेली सूत्रे
ध्यानमंदिरात नामजप करतांना ‘माझ्यातील चैतन्य वाढत आहे, माझ्यावरील अनिष्ट शक्तींचे आवरण नष्ट होत आहे, माझी एकाग्रता वाढत आहे, माझे मन आणि देह यांना शांतता मिळत आहे, तसेच मी देवाजवळ जात आहे’, असे मला जाणवले.
४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बोलत आहेत’, असे जाणवणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आमच्याशी संवाद साधत असतांना माझी भावजागृती होत होती. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मुखातून स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्याशी बोलत आहेत, मला शिकवत आहेत’, असे मला जाणवले. माझ्या आतापर्यंत झालेल्या चुका लक्षात आल्या आणि ‘त्यांवर मात कशी करायची ?’, हे त्यांनीच मला सांगितले.
५. सतत भावजागृती होणे
आश्रमात असतांना माझा भाव सतत जागृत होत होता. ‘त्याच स्थितीत रहावे’, असे मला वाटत होते. आश्रमातून घरी जायला निघतांनाही माझा भाव जागृत झाला.’
– कु. चिन्मय मुजुमले (वय १५ वर्षे), पुणे (१६.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |