साधना शिबिरात सहभागी झालेल्या जळगाव येथील कु. लक्ष्मी हिरामण वाघ यांना आलेल्या अनुभूती

‘१७.११.२०२३ ते २१.११.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या साधना शिबिरात सहभागी झालेल्या जळगाव येथील कु. लक्ष्मी हिरामण वाघ यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. लक्ष्मी वाघ

१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी मानस बोलल्यावर प्रवासात होणारा त्रास थांबणे

‘१६.११.२०२३ या दिवशी मी शिबिराला येतांना घाटातील प्रवासामध्ये मला मोठ्या प्रमाणात मळमळत होते. तेव्हा मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी मानस बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझे मळमळणे लगेच थांबले आणि गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केल्यावर भावजागृतीचा प्रयोग सहजपणे घेता येणे

१८.११.२०२३ या दिवशी दुपारी अश्विनी कुलकर्णी यांनी विचारले, ‘‘भावजागृतीचा प्रयोग कोण घेणार ?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘मी घेते !’ माझ्या मनात ‘मी घेणार’, असा अहंचा विचार आला. तेव्हा ‘भावजागृतीचा प्रयोग कसा घ्यायचा ?’, हे मला सुचत नव्हते. तेव्हा मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर व्यासपिठावर गेल्यावर ‘भावजागृतीचा प्रयोग कसा झाला ?’, हे मला कळलेच नाही.

३. सूत्रसंचालन करतांना वेगळाच उत्साह जाणवणे आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचे दर्शन होणे

१८.११.२०२३ या दिवशी मी साडी नेसले होते. तेव्हा मला ‘आज मला गुरुदेवांचे दर्शन होणार’, असे जाणवत होते. नंतर आयोजकांनी मला ‘‘तू सूत्रसंचालन कर’’, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना होकार दिला. तेव्हा संहिता (स्क्रीप्ट) वाचतांना ‘दैवी बालकांची ओळख’, असे वाक्य वाचल्यावर मला निराळाच उत्साह वाटला. तेवढ्यात तेथे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचे आगमन झाले. मला भगवंताच्या सगुण रूपाचे दर्शन झाले, यासाठी मी भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. लक्ष्मी हिरामण वाघ (वय १६ वर्षे), जळगाव (१६.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक