सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सनातनच्या काही संतांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसत्संगात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सनातनच्या काही संतांविषयी त्यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगितली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. पू. (श्रीमती) निर्मला दाते (सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत, वय ९० वर्षे)

पू. निर्मला दातेआजी

१ अ. मनात इतर कुठलाही विचारच येऊ न देण्याचा ठाम निर्धार करून अखंड नामजप करणार्‍या पू. निर्मला दातेआजी !: ‘पू. दातेआजी म्हणतात, ‘मी काहीच (सेवा) करत नाही, केवळ नामजप करते. कधीतरी माझ्या मनात विचार येतात; पण ‘मनात विचार येऊच नयेत’, असा मी प्रयत्न करते. मनात विचार येऊ लागताच मी माझे मन लगेच नामजपाकडे वळवते.’ यावरून ‘पू. दातेआजी यांच्यासारखा ठाम निर्धार करून नामजप करायला हवा’, हे मला शिकायला मिळाले.

२. पू. सदाशिव परांजपे (सनातनचे ८९ वे (व्यष्टी) संत, वय ८१ वर्षे) आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत, वय ७५ वर्षे) !

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे

२ अ. ‘नामजपादी उपाय करणार्‍या संतांच्या ठिकाणी सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत’, असा भाव ठेवायला सांगून साधकांकडून तळमळीने नामजप करून घेणारे पू. परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) परांजपेआजी ! : पू. परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) परांजपेआजी यांच्यात साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची पुष्कळ तळमळ आहे. ‘साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होईपर्यंत ‘किती नामजप करू’, असे त्यांना वाटते. नामजपादी उपाय करतांना साधकांना झोप लागली, तर ‘त्यांचा वेळ वाया जातो’, हे लक्षात घेऊन ते साधकांना तसे सांगण्याचा प्रयत्न करतात. ते साधकांना नेहमी सांगतात, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला नामजप करण्याची संधी दिली आहे, तर ‘आपण अधिकाधिक नामजप करून त्रास लवकर न्यून होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नामजपादी उपायांच्या वेळी आम्ही (पू. (सौ.) आजी आणि पू. आजोबा) तिथे बसलो नसून सूक्ष्मातून गुरुदेवच तिथे बसले आहेत’, असा भाव ठेवा; कारण त्यांच्या अस्तित्वानेच सर्व काही होते.’’ यावरून त्यांचे साधकांवर असलेले प्रेम आणि नामजपादी उपायांची तळमळ दिसून येते. (क्रमश:)

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/813717.html