Shivani Raja : भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी हातात भगवद्गीता धरून घेतली खासदारकीची शपथ !
सर्वत्र होत आहे कौतुक !
लंडन (इंग्लंड) – युनायटेड किंगडममध्ये झालेल्या निवडणुकीत मजूर पक्षाचा मोठा विजय झाला असला, तरी येथील लेस्टर पूर्व येथे तब्बल ३७ वर्षांनी हुजूर पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. ही जागा मजूर पक्षाचा बालेकिल्ला होता; परंतु येथून भारतीय वंशाच्या २९ वर्षीय शिवानी राजा या निवडून आल्या आहेत. त्यांनी खासदारकीची शपथ घेतांना भगवद्गीतेवर हात ठेवल्याचा त्यांचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे. त्यांनी स्वत: ‘एक्स’वर याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यावरून त्यांचे सर्वत्रच्या हिंदूंकडून कौतुक होत आहे.
It was an honour to be sworn into Parliament today to represent Leicester East.
I was truly proud to swear my allegiance to His Majesty King Charles on the Gita.#LeicesterEast pic.twitter.com/l7hogSSE2C
— Shivani Raja MP (@ShivaniRaja_LE) July 10, 2024
१. व्हिडिओ पोस्ट करतांना त्यांनी लिहिले की, लेस्टर पूर्वचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणे, हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. शपथ घेतांना मला अभिमान वाटला.
२. शिवानी राजा यांनी १४ सहस्र ५२६ मते मिळवत त्यांच्या विरोधी उमेदवाराचा ४ सहस्र ४२६ मतांनी पराभव केला.
Indian-origin UK MP Shivani Raja takes oath on Shrimad Bhagwad Gita after historic win in the general elections
Now it is expected that Shivani Raja should work for the protection of Hindu religion and Hindus !#UKParliament #BhagavadGita #Viralvideo pic.twitter.com/Lt4Uvi8UeL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 11, 2024
३. खासदार शिवानी राजा यांचे आई-वडील गुजरातचे आहेत. शिवानी राजा यांचा जन्म लेस्टरमध्ये वर्ष १९९५ मध्ये झाला.
४. युनायटेड किंगडममध्ये ६५० जागांवर निवडणूक झाली. या निवडणुकीत मजूर पक्षाने ४१२ जागा जिंकल्या, तर हुजूर पक्षाला केवळ १२१ जागा जिंकता आल्या. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना या पराभवानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले, तर मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाचे दायित्व स्वीकारले.
संपादकीय भूमिकाआता शिवानी राजा यांनी हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या रक्षणासाठीही कार्य करावे, अशी अपेक्षा ! |