पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिचे दायित्व पतीवर येत नाही ! – कौटुंबिक न्यायालय

पत्नीला पोटगी नाकारली !

पुणे – पती-पत्नीची आर्थिक पत आणि पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी दाखल पुरावे विचारात घेत न्यायालयाने ‘पत्नीचा सांभाळ करणे, हे पतीचे नैतिक दायित्व नाही’, असे नमूद करून पत्नीला पोटगी नाकारली आहे. केवळ मुलीला प्रतिमहिना ५ सहस्र रुपये पोटगी संमत केली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश रघुवेंद्र आराध्ये यांनी हा निकाल दिला. किरकोळ कारणांवरून पती-पत्नीत भांडणे होऊ लागल्याने पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज करत ५० सहस्र रुपये पोटगी मागितली होती. पत्नी कमावती आहे, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिचे नैतिक अथवा आर्थिक दायित्व पतीवर येत नाही. केवळ पतीला त्रास देण्यासाठी प्रविष्ट करण्यात येत असलेल्या दाव्यांमध्ये असे निकाल महत्त्वाचे ठरतील, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.