आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील शैक्षणिक प्रमाणपत्रे घरबसल्या मिळणार !
शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी ‘ऑनलाईन पोर्टल’चा प्रारंभ !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये आतापर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत होता. या अर्जाची मुद्रित प्रत आणि आवश्यक कागदपत्रांसह विद्यापिठाच्या ‘विद्यार्थी सुविधा केंद्रा’कडे सादर करावी लागत होती. या प्रक्रियेत पुष्कळ अवधी जात असल्याने विद्यार्थ्यांना असुविधा होत होती. विद्यार्थ्यांची ही असुविधा टाळण्यासाठी विद्यापिठाने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि कागदविरहित केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना घरबसल्या शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळू शकणार आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी ‘ऑनलाईन पोर्टल’चे उद्घाटन विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.