देहलीस्थित दलालाची मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी
दलालाला पोलिसांनी घेतले कह्यात
पणजी, १० जुलै (वार्ता.) – देहलीस्थित बांधकाम व्यावसायिकाच्या एका दलालाने मासेमारमंत्री नीळंकठ हळर्णकर, त्यांचा स्वीय सचिव आणि वाहनचालक यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. मंत्री नीळंकठ हळर्णकर यांचे ध्वनीचित्रीकरण करण्यात (व्हिडिओ बनवण्यात) आल्याचा आरोप आहे. रेवोडा येथे ही घटना घडली. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संबंधित दलालाला कह्यात घेतले आहे.