सौ. स्वाती संदीप शिंदे यांना रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरातील पणतीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सौ. स्‍वाती शिंदे

१. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात एका काचेच्या पेटीत एक पणती अखंड तेवत असते. त्या पणतीच्या ज्योतीचे पेटीच्या काचेत आणि पणतीमधील तेलामध्ये प्रतिबिंब पडते. त्या ज्योतीकडे पहातांना सनातनच्या  गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) एकरूपतेविषयी माझ्या मनात आलेले विचार पुढे देत आहे.

अ. ‘पणतीची मुख्य ज्योत, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत.

आ. पणतीच्या तेलामधील ज्योतीचे प्रतिबिंब म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आहेत; कारण त्या आश्रमात राहून गुरुदेवांचे कार्य करत आहेत.

इ. बाह्य काचेमध्ये दिसणारे ज्योतीचे प्रतिबिंब, म्हणजे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेत; कारण त्या गुरुदेवांचे कार्य बाहेर राहून करतात.

२. प्रतिबिंबस्वरूप असलेल्या त्या दोन्ही ज्योती जरी वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी त्या मूळ ज्योतीचीच रूपे आहेत. तिन्ही ज्योतींतील एकरूपता पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक