त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत ज्ञानांचा सतमध्ये विराजमान असणारा आत्मा सद्गुरूंना गवसलेला असणे
सद्गुरूंच्या बाबतीत ‘शाब्दे परे च निष्णातम् ।’ (श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय ३, श्लोक २१) म्हणजे ‘शब्दज्ञानी आणि ब्रह्मानुभवी असे गुरु’ अशी बिरुदावली लावण्यात येते. सखोल आणि आत्मसात केलेले ज्ञान पाहिजे त्या पद्धतीने वापरू शकणे, म्हणजे निष्णात. परा आणि अपरा या दोन्ही प्रकारच्या ज्ञानांचा मूळ स्रोत सतमधून उदित झालेला असतो. ज्ञान त्रिगुणात्मक स्वरूपाचे असो वा त्रिगुणातीत असो, त्याचा आत्मा सत्मध्येच विराजमान असतो. नेमका तोच सद्गुरूंना गवसलेला असतो.