मराठवाडा आणि विदर्भ येथे भूकंप; जीवितहानी नाही !

नागरिक भयभीत

नांदेड – मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील वाशीम येथे १० जुलै या दिवशी भूकंप झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परभणी अचानक भूमी हादरल्याने अनेक लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. भूकंपाचा हा धक्का ४.२ रिक्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. हिंगोलीतील भूकंप ४.५ रिक्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. गोठ्यात बांधलेली गुरेही सैरावैरा होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत होती.