जिल्हा प्रशासनाच्या वतीने कासेगाव येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत !

कासेगाव येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करतांना प्रशासकीय अधिकारी

सोलापूर – आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान यांची पालखी शेगाव येथून १३ जून या दिवशी निघाली आहे. हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या कासेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत ९ जुलैला सायंकाळी पोचला. या वेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहाने स्वागत केले.

या वेळी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, कासेगाव ग्रामपंचायतचे सरपंच यशपाल वाडकर, उळे ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती अंबिका कोळी यांच्यासह कासेगाव परिसरातील विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.