सोलापूर येथे गोमांस वाहतुकीच्या संशयाने अडवलेल्या वाहनात आढळले १ कोटी रुपये !

अकलूज (सोलापूर) – स्थानिक गोरक्षकांनी गोमांस वाहतूक होत असल्याच्या संशयातून एक वाहन अडवले. वाहनचालकाने गाडी अडवल्याची तक्रार करण्यासाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांनी गाडीची पडताळणी केली असता त्यात १ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. मुंबईहून भाग्यनगरकडे जाणार्‍या मासे वाहतूक करणार्‍या या वाहनात कोळंबीसोबत एका खोक्यात ही रक्कम होती. पुढील अन्वेषण करण्यासाठी हे प्रकरण आयकर विभागाकडे वर्ग केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

एवढी मोठी रोख रक्कम कुठून आली ? यामागे नेमका काय उद्देश होता ? याचे अन्वेषण होऊन गुन्हेगारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी केली आहे.