मुख्य आरोपी मिहीर शहा याला विरार येथून अटक !
|
मुंबई – वरळी येथील ‘हिट अँड रन’ अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला विरार येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मिहीर शहा याची आई आणि बहीण यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. मिहीरला साहाय्य करणार्या १२ जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे.
मिहीर शहा याने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात वरळी येथे कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तो फरार झाला. मिहीर शहाची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.