सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ‘केवायसी’ची मुदत वाढवून पैसे देणार ! – अनिल पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री

अनिल पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दुष्काळी निविष्ठा अनुदानातील ४११ कोटी रुपये आतापर्यंत वितरित झाले आहेत. अद्याप १८८ कोटी रुपये वितरित होणे बाकी आहेत. शेतकर्‍यांनी ‘केवायसी’ची मोेहीम प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे ‘केवायसी’ची मुदत वाढवून शेतकर्‍यांना पैसे वितरित केले जातील. सोलापूर जिल्ह्यातील १० मंडळे दुष्काळसदृश म्हणून घोषित केली असून तेथे ८ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. ६ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सवलती मिळत नसतील, तर पडताळणी करून ते मिळण्याविषयी कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी हा प्रश्न विचारला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.