भारताला जागतिक नेता बनण्यासाठी आधुनिक गुरुकुल शिक्षणपद्धत हवी ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
लोणावळा (जिल्हा पुणे) – एकेकाळी विश्वगुरुपदाची बिरुदावली मिरवणारा भारत शिक्षण व्यवस्थेतील पाश्चिमात्यकरणामुळे आज जागतिक शिष्य बनला आहे. आज आपण जगाकडे शिकण्यासाठी जातो; परंतु भारत आपल्या वैदिक ज्ञानाने संपूर्ण जगाला दिशा देऊ शकतो. भारताला पुन्हा जागतिक नेता बनण्यासाठी आधुनिक गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा लागेल, असे प्रतिपादन ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. कार्ला (लोणावळा) येथील अग्रसेन भवन येथे ‘अग्रवाल ग्लोबल फाऊंडेशन’कडून ‘महालक्ष्मी माता शक्तीपीठा’ची उभारणी केली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीमाता मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
संपादकीय भूमिकाआपण आपल्या वैदिक ज्ञानाने जगाला दिशा देऊ शकतो, हे लक्षात घेऊन भारताने कृतीशील व्हावे ! |