Indians In Russian Army : रशियाच्‍या सैन्‍यात भरती झालेल्‍या भारतियांना मायदेशी पाठवण्‍याची पुतिन यांची घोषणा !

पंतप्रधान मोदी यांनी रशिया दौर्‍याच्‍या वेळी उपस्‍थित केले सूत्र

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन व भारताचे पंतप्रधान मोदी

मॉस्‍को – रशिया-युक्रेन युद्ध चालू आहे. रशियामध्‍ये नोकरी लावण्‍याचे आमिष दाखवून काही भारतियांना बळजोरीने रशियाच्‍या सैन्‍यात भरती करण्‍यात आले आहे. हे भारतीय सुखरूप मायदेशी परतणार आहेत. रशिया दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन यांच्‍याकडे रशियाच्‍या सैन्‍यात फसवून भरती केलेल्‍या भारतियांचे सूत्र उपस्‍थित केले. यानंतर पुतिन यांनी रशियाच्‍या सैन्‍यात भरती केलेल्‍या भारतियांना बडतर्फ करून त्‍यांना मायदेशी परत पाठवण्‍याची घोषणा केली.

गेल्‍या महिन्‍यात रशिया-युक्रेन युद्धात २ भारतियांचा मृत्‍यू झाला होता. यानंतर भारताने रशियाकडे सैन्‍यात भरती झालेल्‍या भारतियांना परत पाठवण्‍याची मागणी केली होती. २२ व्‍या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्‍यासाठी पंतप्रधान मोदी मॉस्‍कोला पोचले आहेत.