नाथा उद्धरी मजसी ।
पुणे येथील सौ. अपूर्वा देशपांडे पुष्कळ वर्षांपासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका आहेत. त्यांना सुचलेली कविता येथे दिली आहे.
वाहिले हृदय तव चरणी ।
नाथा उद्धरी मजसी ।। ध्रु. ।।
‘स्वेच्छा-परेच्छा’ काही कळेना ।
ईश्वरेच्छा मज उमगेना ।।
सत्य हे सांगा उलगडूनी ।
नाथा उद्धरी मजसी ।। १ ।।
‘कर्म-अकर्म’ काही कळेना ।
कर्मफलन्याय मज उमगेना ।।
कैसे ऋण फेडू या जन्मी ।
नाथा उद्धरी मजसी ।। २ ।।
‘सगुण-निर्गुण’ मज उमगेना ।
परब्रह्म हे रूप कळेना ।।
भाव हे ठेवू कसे नयनी ।
नाथा उद्धरी मजसी ।। ३ ।।
‘द्वैत-अद्वैत’ मज उमगेना ।
परमात्म्याचे कार्य कळेना ।।
आत्मा जोडी परमात्म्यासी ।
नाथा उद्धरी मजसी ।। ४ ।।
सर्वस्वाचा त्याग कळेना ।
‘सत्त्व–रज–तम’ मज उमगेना ।।
लीन मी झाले तव चरणांसी ।
नाथा उद्धरी मजसी ।। ५ ।।
– सौ. अपूर्वा देशपांडे, पुणे
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |