सोलापूर येथील सनातनच्या साधिका कु. श्रेया गुब्याड एम्.एस्सी. गणितमध्ये विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण !

विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण !

कु. श्रेया गुब्याड

सोलापूर – मूळच्या सोलापूर येथील सनातनच्या साधिका कु. श्रेया गुब्याड यांनी पुणे जिल्ह्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून गणित विषयात एम्.एस्सी. गणितचे शिक्षण पूर्ण केले. त्या ७९.५ टक्के गुणांनी विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण झाल्या असून त्यांना १० पैकी ९.४ (CGPA) प्राप्त झाले आहेत.

याविषयी कु. श्रेया गुब्याड म्हणाल्या, ‘‘केवळ गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) कृपेनेच हे होऊ शकले. पुणे जिल्ह्यात राहून शिक्षण घेतांना त्यांनीच सूक्ष्मातून वेळोवेळी माझी काळजी घेतली. नियमित नामजप केल्यामुळे अभ्यासात पुष्कळ लाभ झाला. शेवटच्या सत्रातील परीक्षांच्या वेळी ‘सनातन गौरव दिंडी’ची महत्त्वपूर्ण सेवा होती; मात्र ‘गुरुदेव अभ्यास करवून घेणार आहेत’, या श्रद्धेमुळे सेवेला निश्चिंत जाता आले आणि त्याचा परीक्षेवर काही परिणाम झाला नाही. आपण देवाची सेवा केली की, देव आपली काळजी घेतो, हेच यातून अनुभवायला मिळाले.’