आजारी असूनही आनंदावस्थेत असणार्या आणि साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणार्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !
‘मी सेवेच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांची आणि माझी भेट झाली. ‘मला पुष्कळ दिवसांपासून त्यांना भेटावे’, असे वाटत होते.
१. ‘पू. निर्मला दातेआजींना पाहिल्यावर त्या आजारी आहेत’, असे न वाटणे आणि त्यांच्या चेहर्यावर लहान बाळाप्रमाणे निरागस भाव दिसणे
‘पू. निर्मला दातेआजींना पाहिल्यावर त्या मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारख्या दिसत होत्या. ‘त्यांना पाहून त्या आजारी आहेत’, असे मला वाटले नाही. त्यांच्या चेहर्यावर लहान बाळाप्रमाणे निरागस भाव होता. त्यामुळे मला ‘आनंदावस्था कशी असते ?’, हे पहायला मिळाले.
२. ‘पू. आजी प्रेमळ दृष्टीने पहात असतांना ‘तिथून जाऊ नये’, असे वाटणे
पू. आजींच्या सुना सौ. नेहा दाते आणि सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांनी पू. आजींशी माझी ओळख करून दिली. त्या आजारी असल्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते, तरी पू. आजी माझ्याकडे प्रेमळ दृष्टीने पहात होत्या. तेव्हा ‘त्या माझ्यावर प्रीतीचा वर्षावच करत असून ‘तिथून जाऊ नये’, असे मला वाटत होते. ‘पू. आजींकडे पहात रहावे’, असे मला वाटत होते. घरी आल्यानंतर मला अजूनही आजींचा आनंदी चेहरा आठवला की, माझी भावजागृती होते.
‘हे गुरुदेवा, ‘आपल्या कृपेमुळे पू. निर्मला दातेआजी यांची भेट झाली. सनातनचे संत हे कितीही आजारी असले, तरी त्यांच्यातील चैतन्य पुष्कळ कार्य करते. ते किती कृपाळू असतात, हे मला अनुभवता आले’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुजाता रेणके (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा.(२२.६.२०२४)