आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ !

गुन्हे शाखेची मुंबई सत्र न्यायालयात माहिती !

आरोपी अरुण गवळी

मुंबई – खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील काही कागदपत्रे गहाळ झाली आहेत. अरुण गवळी याच्यावर मकोका लागू करण्यासंदर्भातील ही कागदपत्रे होती. (मकोकाच्या संदर्भातील आरोपीची कागदपत्रे गहाळ होण्यात निष्काळजीपणा होतोच कसा ? – संपादक) याविषयीची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी मुंबई सत्र न्यायालयात मकोका न्यायालयात दिली. शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. खंडणी, आर्थिक लाभ आणि काही मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी गवळीच्या अधिवक्त्यांनी कागपदत्रांची मागणी केली होती; पण विशेष सरकारी अधिवक्त्यांनी वर्ष २०१३ मध्ये मुंबईत पूर आला असल्याने ठेवलेली कागदपत्रे सापडत नसल्याचे न्यायालयात सांगितले. १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल ? ते सांगा, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना सुनावले होते.

संपादकीय भूमिका 

आरोपी अरुण गवळी याच्या संदर्भातील कागदपत्रे गहाळ झाली कि केली ?, याचे अन्वेषण होणे आवश्यक !