हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे छायाचित्र पहातांना त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीविषयी जाणवलेली सूत्रे

२७.८.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा ‘वर्तमान शालेय आणि अध्यात्म शिक्षण यांतील भेद !’ हा लेख अन् त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र पहातांना मला पुढील सूत्रे जाणवली.

(चित्रावर क्लिक करा)

१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांच्या छायाचित्राकडे एकटक पहातच रहावे, असे वाटते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

२. त्यांचे डोळे आणि ओठ यांकडे आपले लक्ष पटकन वेधले जाते. तेव्हा त्यांच्यातील निरागसता, निर्मळता, वात्सल्यभाव अन् प्रीती (निरपेक्ष प्रेम) प्रकर्षाने जाणवते.

३. ‘ते पितृवत् प्रेमाने आता आपल्याशी काहीतरी बोलतील’, असे मला वाटले आणि माझा त्यांच्याप्रती बालकभाव जागृत झाला.

४. हा लेख वाचतांना त्यांच्याप्रती आत्यंतिक जवळीक वाटते.

५. सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांचा साधनेचा प्रवास शीघ्र गतीने ‘परात्पर गुरु’पदाच्या दिशेने होत असल्याचे जाणवते.

६. ‘सद्गुरु डॉ. पिंगळेकाका हे हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी सूक्ष्म स्तरावर गतीने आणि सर्वाधिक एकरूप झाले आहेत’, असे जाणवते.’

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.९.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक