सिद्धींपेक्षा नामस्मरणाच्या योगाने भगवंत स्वतःच्या आतमध्ये प्रकट होणे हिताचे !
एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी ‘अंगाला सूज येऊ दे’, असे म्हणाला, तर ते वेड्यासारखे होईल. याच्या उलट त्याने नीट औषध घेतले, तर तो कदाचित् लठ्ठ होणार नाही; पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल, तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे, हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)