दुर्बलतेमुळे होणारी हानी

स्वामी विवेकानंद यांची शिकवण 

सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्‍या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्‍यांची हानी आणि त्यांचे अनिष्ट करतो.

भित्री माणसेच पाप करत असतात. जे खरे वीर असतात, ते कधीच पाप करत नाहीत. सर्वांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करा. फसवणूक करून कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम, सत्यनिष्ठा आणि प्रचंड उत्साह यांच्या द्वारेच महान कार्ये होत असतात.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)