Netherlands PM Cycled Home : नेदरलँड्सचे पंतप्रधान त्यागपत्र देऊन सायकलवर बसून घरी गेले !
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नेदरलँड्सचे १४ वर्षे पंतप्रधान राहिलेल्या मार्क रूटे यांनी नुकतेच त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यांनी पदाचे हस्तांतरण केल्यानंतर सायकलवर बसून ते घरी निघून गेले. अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या घटनांच्या वेळी मोठे कार्यक्रम केले जातात; मात्र रूटे यांनी साधेपणाने हस्तांतरण केले. डिक स्कोफ हे नेदरलँड्सचे नवे पंतप्रधान झाले आहेत.
संपादकीय भूमिकाअसे जगात अन्यत्र कुठेतरी परत होईल; पण भारतात असे होऊ शकणार नाही; कारण भारतीय राजकारण्यांची मानसिकता अशी असूच शकत नाही ! |