Sri Lanka China Relations : चिनी गुप्तहेर नौकांवरील बंदी उठवण्याचा श्रीलंका सरकारचा निर्णय !
भारताची डोकेदुखी वाढणार
कोलंबो – चिनी गुप्तहेर नौका वारंवार श्रीलंकेत येण्याचा प्रयत्न करत होत्या; परंतु श्रीलंका सरकारने त्यावर बंदी घातली होती. आता ही बंदी उठवण्याचा निर्णय श्रीलंका सरकारने घेतला आहे. श्रीलंकेच्या या निर्णयामुळे भारताची डोकेदुखा नक्की वाढणार आहे. जपानी प्रसारमाध्यमांनुसार श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी बंदी उठवण्याच्या निर्णयाची माहिती ‘एन्.एच्.के. वर्ल्ड जपान’ला दिली आहे.
Sri Lankan Government to lift ban on Chinese spy ships. — Decision not in favor of India.#SriLanka pretends to be a strategic partner of India, but often succumbs to Chinese pressure.
Considering such alarming situations, India must be ready for war at all times.… pic.twitter.com/GzS1Y2ScxU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 8, 2024
१. भारत सरकारने हिंद महासागरात चिनी संशोधन नौकांच्या वाढत्या हालचालींविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच, त्या हेरगिरी नौका असल्याचा संशय व्यक्त केला होता.
२. अशा नौकांना आपल्या बंदरांवर येऊ देऊ नये, असे आवाहन श्रीलंकेला केले होते. भारताच्या विनंतीनंतर श्रीलंकेने विदेशी संशोधन नौकांना त्याच्या बंदरावर येण्यास बंदी घातली होती.
३. साबरी म्हणाले की, त्यांना इतरांच्या वादात पडायचे नाही. त्यामळे श्रीलंका पुढील वर्षापासून त्याच्या बंदरांवर विदेशी संशोधन नौकांना येण्यावर बंदी घालणार नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीही २ चिनी नौकांना श्रीलंकेच्या बंदरांवर येण्याची अनुमती देण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाश्रीलंका स्वतःला ‘भारताचा मित्र’ म्हणवून घेतो; मात्र चीनच्या दबावामुळे तो झुकून भारतविरोधी निर्णय घेतो ! हे लक्षात घेऊन भारताने युद्धसज्ज होणे आवश्यक ! |