श्री केदारलिंगाच्या (जोतिबादेव) मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले !

श्री देव जोतिबा

कोल्हापूर – पुरातत्व विभागाच्या वतीने श्री केदारलिंगाच्या म्हणजे श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार होता. श्री जोतिबा देवाची यात्रा १० ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी पूजार्‍यांना अगोदरपासून सिद्धता करावी लागते. तरी मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष यांच्याकडे पुजार्‍यांनी केली होती. याचा विचार करून श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री केदारलिंगाच्या (जोतिबादेव) मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे. यामुळे श्री केदारलिंग देवाचे दर्शन नियमितपणे चालू असेल, असे समितीकडून कळवण्यात आले आहे.