अनंतपटींनी चांगले आणि मोठे कार्य कोणते ?
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
माणूस हा तोपर्यंतच माणूस असतो की, जोपर्यंत तो प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. ही प्रकृती ‘बाह्य’ आणि ‘आंतर’ अशी २ प्रकारची आहे. बाह्य प्रकृतीला जिंकणे, ही चांगली आणि मोठ्या गौरवाची गोष्ट आहे; पण अंतःप्रकृतीला जिंकणे, ही त्याहूनही अधिक गौरवाची गोष्ट आहे. आकाशातील तारे आणि ग्रह यांचे नियमन करणार्या नियमांचे ज्ञान प्राप्त करून घेणे, ही चांगली आणि मोठी गोष्ट आहे; पण मानवजातीच्या वासनांचे, भावनांचे आणि इच्छाशक्तीचे नियमन करणार्या नियमांचे ज्ञान प्राप्त करून घेणे, हे त्याहून अनंतपटींनी चांगले आणि मोठे कार्य आहे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)