नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी ।

सनातन संस्थेचे १७ वे संत पू. उमेश शेणै (पू. उमेश अण्णा) यांचा ज्येष्ठ अमावास्या (५.७.२०२४) या दिवशी ७५ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सनातन संस्थेचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतापुष्प !

पू. उमेश शेणै
पू. शिवाजी वटकर

पू. उमेश शेणै कर्नाटक राज्यी प्रकटूनी संत झाले ।
पू. अण्णांचे साधकांसाठी देवद आश्रमी चरण लागले ।। १ ।।

योगायोग असे पू. अण्णा देवद आश्रमी येण्याचा ।
पू. अण्णांच्या सत्संगाने देवद आश्रम तीर्थक्षेत्र होण्याचा ।। २ ।।

परम पूज्य (टीप) नामे आम्हां गुरु लाभले ।
म्हणूनिया पू. अण्णा देवदच्या साधकांना भेटले ।। ३ ।।

नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी ।
पू. अण्णांच्या सत्संगरूपी चैतन्याने साधक पावन होती ।। ४ ।।

पू. अण्णांचा गुरुभाव अन् महिमा वर्णावा किती ।
पू. अण्णा सनातनच्या संतमाळेतील रत्न शोभती ।। ५।।

पू. अण्णा अमावास्येला जन्मूनी चैतन्याचा प्रकाश देती ।
कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करूया पू. अण्णांच्या चरणी ।। ६ ।।

टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल, (४.७.२०२४)