अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात फेकले २ दारूगोळे, एकाचा स्फोट !
अमरावती – अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ६ जुलैच्या रात्री उशिरा दोन दारूगोळे आढळले. यांतील एका गोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे मोठा आवाज झाला. यामुळे कारागृह प्रशासन आणि बंदीवान यांची धावपळ झाली.
१. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनुमाने १ सहस्र १०० हून अधिक बंदीवान आहेत. यांतील काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर काही जणांच्या विरोधात खटले चालू आहेत. येथे मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि नाशिक येथील बंदीवान आहेत.
२. संबंधित दारूगोळे महामार्गाला लागून असलेल्या भिंतींवरूप आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. फुटलेल्या गोळ्यांचे अवशेष जमा करून घटनास्थळी बाँबशोधक आणि बाँबनाशक पथक आले होते. पथकाने दुसरा गोळा हस्तगत करत तो निकामी केला. या गोळ्यांमध्ये स्फोटकांमध्ये वापरण्यात येणारी दारू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलीस चौकशी चालू आहे.