Rain Halts Chardham Yatra : मुसळधार पावसामुळे चारधाम आणि अमरनाथ यात्रा थांबवली !
गढवाल (उत्तराखंड) – येथे मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. बद्रीनाथ-विष्णु प्रयाग राष्ट्रीय महामार्गाजवळ दरड कोसळल्याने रस्ता ठप्प झाला आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली.
१. उत्तरप्रदेशामध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून २ जणांचा मृत्यू झाला. यासह अन्य एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
२. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आलेल्या पुरात आतापर्यंत ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तर ९५ प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे.